राजुरा प्रतिनिधी :- लीलाधर काळे ( गडचांदूर )
जनसेवेचा वारसा लाभलेले व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व माजी आमदार संजयभाऊ धोटे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले. आज सकाळी १० वाजता त्यांनी प्रणय यादव ढोले यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
घरी जाऊन केला सन्मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण केवळ कार्यालयात बसून नव्हे, तर थेट कार्यकर्त्यांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन त्यांचे मनोबल वाढवण्याची संजयभाऊंची कार्यशैली आज पुन्हा एकदा दिसून आली. आज दि. ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास संजयभाऊ धोटे यांनी प्रणय ढोले यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रणय ढोले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🛑 दिग्गज कार्यकर्त्यांची उपस्थिती 🛑
या सत्कार सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनेक निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
सतीशभाऊ धोटे, महादेव तपासे,जनार्दनक् निखोडे, राजू गौरव, शेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या छोटेखानी पण दिमाखदार सोहळ्यामुळे परिसरात भाजपच्या संघटन शक्तीची आणि संजयभाऊंच्या दांडग्या जनसंपर्काची जोरदार चर्चा सुरू आहे.
👉 “कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे, आणि त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या सत्कारामुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र दिसत आहो.
🙏 जय विदर्भ 🙏




