चंद्रपूर/सावली :-
गेल्या अनेक दिवसांपासून सावली आणि मुल परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या ‘शेटटी गँग’च्या कुख्यात म्होरक्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सावली पोलिसांना मोठे यश आले आहे. अटकेत असलेल्या या अट्टल गुन्हेगाराकडून पोलिसांनी ११२ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली असून, याची बाजारपेठ किंमत साधारण १६ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.
गुप्त माहिती अन् नागपुरातून आवळल्या मुसक्या
सावली आणि मुल परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेला एक ‘गोपनीय टिप’ मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपुरात धाड टाकून शेठ ऊर्फ रमेश वेलादन शेटटी (राहणार चंद्रपूर, सध्या मुक्काम दिघोरी, नागपूर) याला शिताफीने ताब्यात घेतले.
⭕सोनारांना विकले होते चोरलेले सोने ⭕
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपले गुन्हे कबूल केले. आरोपीने सावली पोलीस स्टेशन (गुन्हा क्र. १०७/२०२५) आणि मुल पोलीस स्टेशन (गुन्हा क्र. २५२/२०२५) अंतर्गत केलेल्या घरफोडीतील सोन्याचे दागिने नागपूर येथील तीन सोनारांना विकले होते. पोलिसांनी या सोनारांकडून चोरीच्या सोन्याचे वितळवलेले ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे (लगड) जप्त केले आहेत. ⭕ महत्त्वाची कलमे ⭕ आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
⭕ कर्तबगार टीमची मोठी कामगिरी ⭕
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुक्काम,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात:
👉 श्री. अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा)
👉 श्री. प्रदिप पुल्लरवार (पोलीस निरीक्षक, सावली)
👉 सपोनि दिपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार सपोनि संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे, पोउपनि .श्री. विनोद भुरले , पोउपनि.श्री. सचिन मुसळे , पोउपनि ,धनराज करकाडे , चेतन गज्जलवार, पोहवा, सुरेंद्र महंतो , पोहवा, मोहन दासरवार , पोहवा
गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, अजित शेन्डे, सुमित बरडे, धिरज पिदुरकर, अशोक मडावी, मिलींद टेकाम, गजानन मडावी
👉 टीप: – ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली यांनी संयुक्तरीत्या केली आहे.आणि एलसीबी व सावली पोलीस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




