चंद्रपूर/वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही ठराविक माध्यमांतून आमदार श्री. करण देवतळे यांच्या ताडोबा सफारी संदर्भात जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य समोर आले असून विरोधकांचा हा राजकीय स्टंट पूर्णपणे उघडा पडला आहे.
नेमकी सत्य परिस्थिती काय ?
जानेवारी महिन्यात आमदार करण देवतळे हे आपल्या पत्नीसह ताडोबा येथे पर्यटनासाठी गेले होते. या खासगी सहलीदरम्यान त्यांनी काही व्हिडिओ चित्रीकरण केले होते. वनविभागाच्या नियमांनुसार तांत्रिक त्रुटी आढळताच, एका जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका बजावत आमदार साहेबांनी तात्काळ दंड (Fine) भरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. > “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे मानणाऱ्या आमदार साहेबांनी कोणत्याही वादात न पडता वनविभागाच्या नियमांचा आदर राखला आणि स्वतःहून दंडाची रक्कम भरून हे प्रकरण जानेवारीतच पूर्ण केले होते.”
जुना व्हिडिओ, नवा कट!
सध्या प्रसारित केला जाणारा व्हिडिओ हा आजचा नसून जानेवारी महिन्यातील आहे. विशेष म्हणजे, सध्या आमदार करण देवतळे हे २२ मार्चपासून केरळ राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या कामाच्या धडाक्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने, त्यांच्या जुन्या प्रकरणाला ‘फोडणी’ देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.
विरोधकांना सडेतोड उत्तर:
👉 पारदर्शकता :- आमदार साहेबांनी कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता कायद्याचे पालन केले आहे.
👉 राजकीय षडयंत्र: केरळ दौऱ्यात मिळालेल्या यशावरून लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘फेक न्यूज’ पसरवली जात आहे.
👉 जनतेचे आवाहन: अर्धवट आणि खोडसाळ बातम्यांवर विश्वास ठेवू नका. विकासकामे रोखता येत नसल्याने विरोधक आता चारित्र्यहननाचा मार्ग अवलंबत आहेत.
🛑 आमदार करण देवतळे कायद्याचा सन्मान करणारा लोकनेता 🛑
नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी आग्रही असणारे आमदार देवतळे यांनी या घटनेतूनही आपली नैतिकता सिद्ध केली आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात जनतेने सावध राहावे, असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आले आहे.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!
🙏 जय विदर्भ🙏




