वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा-चंद्रपूर महामार्गावर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी अशोक लेलँड गाडी ही वरोरा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत १० गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीमुळे हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला.
🛑 नेमकी घटना काय 🛑
मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास बजरंग दलाचे ते टेमुडा व वरोरा चे कार्यकर्ते मीळुन सूरज दुबे यांना एका गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून एका आयशर ट्रकमध्ये जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे सूरज दुबे, आदेश भुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेंभुर्डा गावाजवळ सापळा रचला.
रात्री ८:३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून येणारा अशोक लेलंड कंपनीचा मोठा दोस्त (क्रमांक MH34-BZ-7194) संशयास्पदरित्या येताना दिसला. कार्यकर्त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
१० जनावरांची निर्दयतेने कोंडाकोंडी
कार्यकर्त्यांनी गाडीची पाहणी केली असता, त्यात १० गोधर्मीय जनावरे (गाई आणि कालवडी) अतिशय निर्दयतेने पाय बांधून कोंडलेल्या अवस्थेत आढळली. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. जप्त केलेल्या जनावरांमध्ये विविध रंगांच्या गाई आणि लहान कालवडींचा समावेश असून, त्यांची अंदाजे किंमत १,०५,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालक आणि मालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी आणि अवैध वाहतुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले वाहन (किंमत अंदाजे ५ लाख रुपये) आणि जनावरे असा एकूण ६,०५,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज विलासराव वासाडे हे करत आहेत. बजरंग दलाच्या या सतर्कतेमुळे गोवंशाचे प्राण वाचल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
🙏 जय विदर्भ🙏




