चंद्रपूर :- अभिषेक भागडे
“महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये” : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महिला दिनाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरात महिलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांनी आपल्या बॅट आणि बॉलच्या जोरावर मैदान गाजवत ‘आझाद गार्डन क्रिकेट संघ’ विजेतेपदावर नाव कोरले.
मैदानावर रंगला क्रिकेटचा थरार
मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने १४ व १५ मार्च रोजी ‘टिकी टाका टर्फ’ येथे या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये:
* प्रथम क्रमांक: आझाद गार्डन क्रिकेट संघ
* द्वितीय क्रमांक: इरई क्रिकेट संघ
* तृतीय क्रमांक: महिला वकील संघ
वैयक्तिक कामगिरीचा गौरव
सांघिक यशासोबतच वैयक्तिक पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला:
* वुमन ऑफ द सिरीज: साधना प्रजापती (इरई संघ)
* बेस्ट बॅट्समन: अनुष्का कल्लेपल्ली (आझाद गार्डन)
* बेस्ट बॉलर: अश्विनी जाधव (CMC)
* बेस्ट फिल्डर: श्वेता आईचवर (आझाद गार्डन)
विजेत्यांना रोख रक्कम, चषक, ड्रेसिंग टेबल, कुलर आणि डिनर सेट यांसारखी आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
खासदारांचा मोलाचा संदेश
खेळाडूंना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “महिलांनी आज चूल आणि मूल या पलीकडे जाऊन प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम केले पाहिजे. आपल्या परिसरातील महिलांमध्ये सुप्त गुण आहेत, फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे.”
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष कुंदा जेणेकरकर, माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका सुनिंदा धोबे यांच्यासह अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल,वरोरा तर्फे सर्व महिला खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
🙏जय विदर्भ 🙏




