Home जिल्हा महिलांची प्रगती की अधोगती? आत्मचिंतन करण्याची गरज: सामाजिक कार्यकर्त्या योगिता लांडगे यांचे...

महिलांची प्रगती की अधोगती? आत्मचिंतन करण्याची गरज: सामाजिक कार्यकर्त्या योगिता लांडगे यांचे प्रतिपादन

वरोरा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरोरा येथील बावणे -लेआउट, एकअर्जुना रोड रोडवरील शिव मंदिर परिसरात महिला बचत गटांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. नगरसेविका सौ. मंगलाताई पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या सद्यस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंगलाताई पिंपळकर नगरसेविका होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा सौ. योगिता नेरकर , ‘सखी मंच’ संयोजिका उज्वलाताई शिरटकर, सामाजिक कार्यकर्त्या योगिता लांडगे, कल्पनाताई मोरे आणि डॉ. झाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आत्मचिंतनाचे आवाहन
याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्त्या योगिता लांडगे यांनी महिलांना अंतर्मुख होण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या,
> “२१ व्या शतकात आपण वावरत असताना केवळ ‘महिला दिन’ साजरा करून चालणार नाही. आज खऱ्या अर्थाने महिलांची प्रगती होत आहे की अधोगती, यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. महिलांनी आपल्या हक्कांसोबतच स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.”
विविध विषयांवर मार्गदर्शन
मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि सामाजिक सहभाग यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. अर्चनाताई ठाकरे नगराध्यक्ष वरोरा आणि मंगलाताई पिंपळकर नगरसेविका यांनी महिलांच्या प्रगतीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या मेळाव्याला वार्डातील सर्व बचत गटांच्या सदस्यांनी आणि स्थानिक महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वार्डातील कार्यकर्त्यांनी व बचत गट सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या या भरगच्च उपस्थितीने महिला शक्तीचे दर्शन घडविले.
🙏🏻 जय विदर्भ 🙏🏻