Home राजकारण मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

म आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानात झालेल्या हल्ल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीत राजकीय गोंधळ उडाला आहे.

दरम्यान स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.

दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि बिभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आले.

मालिवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हा ती मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी गेली तेव्हा बिभवने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात काउंटर केस दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बिभवने स्वाती मालीवाल यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी शुक्रवारी ईमेलद्वारे दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामध्ये बिभवने स्वत:ला निर्दोष घोषित करत स्वाती मालीवाल यांचा हेतू अरविंद केजरीवाल यांना हानी पोहोचवण्याचा असल्याचे म्हटले आहे.

पोलीस आता बिभवला रुग्णालयात नेणार असून काही वेळात त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांना बिभव दिल्लीबाहेर नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती.