वरोरा :- अभिषेक भागडे
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी वरोरा शहरात विशेष आयोजन करण्यात आले असून, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत नागरिकांना दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे.
या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमासाठी वरोरा शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार बांधव, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी बांधव तसेच अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, स्पष्टवक्ते व जनतेशी नाळ जोडून ठेवणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी असून, त्यांचे कार्य आणि विचार सदैव स्मरणात राहतील, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : योगेश डाहुले स्मारक चौक, वरोरा, जिल्हा चंद्रपूर
वेळ : सकाळी ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.☎️ 9673574711
☎️ 8329889832




