आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे सी.ए. करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वरोरा | प्रतिनिधी : अभिषेक किशोरराव भागडे
महारोगी सेवा समिती, आनंदवन यांच्या अधिपत्याखालील आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी रोजी चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सी.ए. पायल अग्रवाल (चंद्रपूर) या होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सी.ए. या व्यावसायिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि समर्पण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सी.ए. अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धत व भविष्यातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र पाटील (विभाग प्रमुख, वाणिज्य विभाग) होते, तर प्रा. विजय गाठले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. निखिल चिडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप ताजने यांनी केले.
या मार्गदर्शन सत्राला बी.कॉम. व बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास प्रा. टिपले, प्रा. टोंगे, प्रा. विजय गाठले यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
🙏जय विदर्भ🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
📞 9673574711
📞 8329889732




