चंद्रपूर : ✍️अभिषेक भागडे
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य पुरस्कृत लाभार्थी हिस्सा असलेल्या अद्ययावत मासोळी बाजार उभारणीसाठी 5 कोटी 95 लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल श्री. अजय सरकार,समस्त बंगाली समाज, बंगाली व्यापारी, बंगाली कॅम्प येथील मच्छी विक्रेते तसेच इरई धरण मच्छिमार सोसायटी यांच्या वतीने करण्यात आलेल्या आत्मीय सत्काराबद्दल सर्वांचे मनस्वी आभार.
श्री. अजय सरकार यांनी मांडलेल्या चंद्रपूर येथील बंगाली कॅम्पमधील आधुनिक मासोळी बाजाराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्या ठिकाणी बाजार उभारणीस मी मत्स्यव्यवसाय मंत्री असताना 2023 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात आली होती. तसेच पालघर-सातपाडी येथे मत्स्यव्यवसायीक बांधवांनी मांडलेल्या मागणीनुसार तेथील आधुनिक मासोळी बाजारालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. पुढील वर्षी हे दोन्ही मासोळी बाजार मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांच्या सेवेत समर्पित होतील, असा दृढ विश्वास याप्रसंगी व्यक्त केला आहे.🙏 जय विदर्भ 🙏 बातमी व जाहीराती करिता संपर्क साधा. ☎️9673574711☎️ 8329889732




