वरोऱ्यात सौ. मायाताई रमेश राजूरकर यांच्या उमेदवारीला जबरदस्त जनसमर्थन
वरोरा✍️( अभिषेक भागडे ): आगामी वरोरा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी तर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ. मायाताई रमेश राजूरकर यांची उमेदवारी जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया दिसून येत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा–भद्रावती मतदारसंघात तब्बल ३५ हजारांहून अधिक मते मिळवत प्रभावी उपस्थिती दर्शवणारे डॉ. रमेश राजूरकर यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने संपूर्ण वरोरा–भद्रावतीतील भाजप पक्षसंघटन अधिक मजबूत झाले असून, संघटनात्मक जाण व अनुभव ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळूनही त्यांनी कुठलीही नाराजी व्यक्त न करता पक्षनिष्ठा जपली. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या स्वच्छ आणि संयमी नेतृत्वाचा आदर अधिक दृढ झाला. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी डॉ. राजूरकर यांच्या पत्नी सौ. मायाताई रमेश राजूरकर यांच्या नावाची घोषणा होताच जनतेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पेशाने शिक्षिका, सुशिक्षित, सभ्य, सौम्य आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या मायाताई यांच्या उमेदवारीला महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच स्तरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. राजूरकर कुटुंबाचे राजकारणातील पारदर्शकता, स्वच्छ प्रतिमा, कोणत्याही अवैध किंवा गैरव्यवहारांपासून दूर असलेली नितळ ओळख हे त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण मानले जाते.
वरोरा शहरातील नागरिकांमध्ये “स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व शहराला मिळावे” ही भावना प्रबळ असून, त्या भावनेला अनुरूप नेतृत्त्व म्हणून मायाताई राजूरकर यांना मोठे पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.
आजच्या राजकीय वातावरणात स्वच्छ, सुशिक्षित आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारे कुटुंब राजकारणात येणे हे वरोरा शहरासाठी भाग्य असल्याचे जनतेकडून व्यक्त केले जात आहे. आगामी निवडणुकीत भरघोस मतांच्या आघाडीने मायाताई राजूरकर विजयी होतील, असा प्रबळ विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा.☎️9673574711☎️8329889732 )




