Home जिल्हा महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी

महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी

प्रयागराजचे संगम रेल्वे स्थानक 14 तारखेपर्यंत बंद

प्रयागराज (Prayagraj) 10 फेब्रुवारी :- उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात भाविकांची गर्दी वाढतच आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगम रेल्वे स्थानक 14 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशच्या मैहर पोलिसांच्या माहितीनुसार, प्रयागराजकडे जाणे अशक्य झाले आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या मार्गांवर 200 ते 300 किलोमीटर लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. यामुळे महाकुंभमेळ्याला जाणारे हजारो भाविक महामार्गांवर अडकून पडले आहेत मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेजवळील रिवा जिल्ह्याच्या चाकघाट येथे 250 किमीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच मध्यप्रदेशच्या जबलपूरच्या आधी 15 किमी वाहतूक ठप्प झाली आहे. या पाश्वूभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. यादव म्हणाले की, “प्रयागराज येथील महाकुंभात अडकलेल्या लाखो भाविकांसाठी तातडीने आपत्कालीन व्यवस्था करायला हवी. वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या भुकेल्या, तहानलेले आणि थकलेल्या भाविकांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायला हवे. सामान्य भाविक माणूस नाही का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

Prayagraj to kashi distance
Prayagraj old name
Prayagraj news
Prayagraj jam
Prayagraj famous for
Prayagraj Pin Code
Prayagraj meaning
Why was Allahabad name changed to Prayagraj