Home महाराष्ट्र फेब्रुवारीत 111 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार 

फेब्रुवारीत 111 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार 

फेब्रुवारीत 111 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार 
by-elections-will-be-held-in-111-gram-panchayats-in-february

अमरावती 21 जानेवारी। (Amaravti) :-  अमरावती जिल्ह्यात गत वर्षभरापासून रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक विभागाने आयोगाला रिक्तपदांचा अहवाल पाठविला आहे. त्यानूसार १११ ग्रामपंचायतींमध्ये १३१ सदस्य व ५ थेट सरपंच पदाकरीता निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये निधन, राजीनामा, अपात्र अशा कारणांमूळे रिक्त झालेल्या पदांकरिता पोटनिवडणूक घेणे गरजेचे आहे. मागील एक वर्षांपासून सदर ग्रामपंचतींमध्ये पोटनिवडणूका रखडलेल्या आहेत. सुरूवातीला लोकसभा त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमूळे या निवडणुकांना स्थगिती होती.

आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने आयोगा कडून फेब्रुवारीच्या १० तारखेपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहीती आहे. जिल्हा निवडणूक विभागाला ३१ डिसेंबर पर्यंत रिक्त जागांचा अहवाल आयोगाने मागितला होता. सदरचा अहवाल आयोगाकडे प्राप्त झाल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदार यादी कार्यक्रम लागण्याची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदार यादी कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सद्या १११ ग्रामपंचायतींमध्ये १६१ सदस्य व पाच ग्रामपंचायतींमध्ये ५ थेट सरपंच पदाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये आता पोटनिवडणुकीची धूम सुरू होणार आहे.

येथे होणार थेट सरपंच पदाची निवडणूक तिवसा तालुक्यातील आखतवाडा सरपंचपद महीला नामाप्र करीता रिक्त आहे. वणी ममदापूर सर्वसामान्य महीला, चांदूरबाजार तालूक्यातील सर्फाबाद अनुसूचित जमाती महीला, टाकरखेडा पुर्णा अनुसूचित जमाती व धारणी तालूक्यातील खापरखेडा अनूसुचित जमाती या प्रवर्गाकरिता सरपंच पद रिक्त आहे. अशा पाच ठिकाणी थेट सरपंच पदाकरीता निवडणूक होणार आहे. जिल्हानिहाय रिक्त पदे अमरावती – १ भातकुली – १२ नांदगाव खंडेश्वर – ९ चांदूर रेल्वे – ९ धामणगाव रेल्वे – ६ तिवसा -६ मोर्शी-१४ वरूड-१३ चांदूरबाजार -७ अचलपूर -१८ अंजनगाव सुर्जी -८ दर्यापूर-१८ चिखलदरा -१४ धारणी -२६ एकूण १६१

Amravati district wikipedia
Amravati is in which state
Amravati Pin Code
Amravati temple
Amravati Map
Amravati Hyderabad
Amravati distance
Amravati tourism