Home राजकारण काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
second-list-of-23-congress-candidates-announced

मुंबई (Mumbai) २६ ऑक्टोबर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज, शनिवारी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आता दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congess) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यात तीन महिलांना विधानसभेचं तिकीट दिली आहे. जळगाव- जामोदममधून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार, भंडाऱ्यातून पूजा ठावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काही विद्यमान आमादारांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिरोळची जागा काँग्रेसला स्वत: कडे ठेवण्यात यश आलं आहे. तर श्रीरामपूरच्या जागेवर काँग्रसने धक्कातंत्र अवलंबलं आहे

या यादीत भुसावळ – राजेश मानवतकर, जळगाव – स्वाती वाकेकर, अकोट – महेश गणगणे, वर्धा – शेखऱ शेंडे, सावनेर – अनुजा केदार, नागपूर दक्षिण – गिरिश पांडव, कामठी – सुरेश भोयर, भंडारा – पूजा ठावकर, अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड, आमगाव – राजकुमार पुरम, राळेगाव – वसंत पुरके, यवतमाळ – अनिल मांगुलकर, आर्णी – जितेंद्र मोघे, उमरखेड – साहेबराव कांबळे, जालना – कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख, वसई : विजय पाटील, कांदिवली पूर्व : काळू बधेलिया, चारकोप – यशवंत सिंग, सायन कोळीवाडा : गणेश यादव, श्रीरामपूर : हेमंत ओगले, निलंगा : अभय कुमार साळुंखे, शिरोळ : गणपतराव पाटील यांचा समावेश आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai Indians
Mumbai district name
Mumbai population
Where is Mumbai located in India
Flights to Mumbai
Mumbai city name list