Home राष्ट्रीय Gadchiroli : माजी नक्षलची गोळ्या घालून हत्या

Gadchiroli : माजी नक्षलची गोळ्या घालून हत्या

Gadchiroli : माजी नक्षलची गोळ्या घालून हत्या
Gadchiroli : माजी नक्षलची गोळ्या घालून हत्या

गडचिरोली (Gadchiroli ) 26 जुलै:- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज, शुक्रवारी पहाटे एका माजी नक्षलवाद्याची गोळ्या घालून हत्या केली. जयराम कोमटी गावडे

असे या पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी होता.

जयराम गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे. नक्षलवाद्यांनी 25 जुलैच्या रात्री आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे. नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 माओवाद्यांना कंठस्नान घातले होते.

यात मोठ्या कॅडरच्या माओवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तर माओवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याच्या (Naxalite) हत्येची घटना घडली. विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान माओवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात. मात्र, सप्ताहाच्या पूर्वीच अमरगड तालुका मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित माओवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.

Gadchiroli in marathi
Gadchiroli wikipedia
Why Gadchiroli is dangerous
Gadchiroli is famous for
Gadchiroli Map
www.gadchiroli.nic.in 2024
Gadchiroli district information
Gadchiroli Collector Name list