29 November 2026News Website

‘समान काम, समान वेतन’साठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार

वरोरा :- “हम सब एक है, अभी नही तो कभी नही!” असा बुलंद नारा देत आणि चारही महासंघांच्या कडक पाठिंब्यान्वर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात आज तीव्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी सर्व दुय्यम न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना सन २००६ पासून थकबाकीसह लागू करावी, या एकमेव आणि अत्यंत न्याय्य मागणीसाठी आज जिल्हा सत्र न्यायालयाच्या कर्मचाऱ्यानी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.



शासनाच्या दुजाभावाविरोधात तीव्र संताप न्यायदान प्रक्रियेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांकडून उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांएवढेच किंवा त्याहून अधिक कष्टाचे काम करून घेतले जाते, मात्र वेतनाच्या बाबतीत शासनाकडून सातत्याने दुजाभाव केला जात आहे. “समान काम, समान वेतन” या मूलभूत तत्त्वांनाच शासन हरताळ फासत असल्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविद्ध तीव्र संताप उसळला आहे. सन २००६ पासूनची ही प्रलंबित मागणी तात्काळ मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

चारही महासंघांचा अभूतपूर्व पाठिंबा या आंदोलनाला राज्य पातळीवरील प्रमुख चारही महासंघांनी आणि संघटनांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने शासनाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. यामध्ये खालील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील संघटनांचे संपूर्ण समर्थन लाभले आहे:

  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट – क) 
  • महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन 
  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ 
  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ 

“उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनाही सन २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी  थकबाकीसह लागू करावी, ही आमची स्पष्ट मागणी आहे. ‘समान काम, समान वेतन’ हा आमचा अधिकार असून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.”  आक्रमक आंदोलक व संघटना पदाधिकारी

अभिषेक किशोर भागडे