29 November 2026News Website

वरोरात भव्य छठपूजा उत्सव अभूतपूर्व उत्साहात संपन्न; प्रशासनासह नागरिकांचे समितीकडून आभार

वरोरा :- वरोरा शहरात यंदाचा छठपूजा उत्सव अत्यंत भव्य, दिव्य आणि अभूतपूर्व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला. शहरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे या उत्सवाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, वरोरा शहर छठपूजा समितीने सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.



हा भव्य सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्याचे आदरणीय आमदार श्री. करणदादा देवतळे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच वरोरा तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासन, कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आणि नगर परिषद वरोरा यांनी चोख सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेची उत्तम जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या सक्रिय योगदानामुळेच हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होऊ शकला.



या उत्सवाचे खरे यश हे वरोरा शहरातील सर्व नागरिकांच्या प्रेमाचे आणि एकजुटीचे फलित आहे. नागरिकांनी दाखवलेला प्रचंड उत्साह आणि दिलेल्या सहकार्याबद्दल वरोरा शहर छठपूजा समितीच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

 

अभिषेक किशोर भागडे