Home जिल्हा वरोऱ्यात रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने...

वरोऱ्यात रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने दिमाखदार ‘तान्हा पोळा उत्सव २०२६’ संपन्न होणार.

वरोरा :- रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुप वरोरा प्रायोजित ‘तान्हा पोळा उत्सव २०२६’ चे आयोजन दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ११ सप्टेंबर २०२६ ला रेल्वे स्टेशन चौक परिसरात बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणी ठरावा असा सण व दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या सण उत्सवाचे महत्त्व टिकून राहावे या उद्देशाने रेल्वे स्टेशन चौक व्यापारी मंडळ वरोरा प्रेरीत होऊन पुढे आले आहे.
व्यापारी मंडळ तान्हा पोळा उत्सव समिती, रेल्वे स्टेशन चौक, वरोरा यांच्या वतीने बालगोपाळांसाठी आयोजित लाकडी बैल सजावट स्पर्धेतील उत्कृष्ट सजावटीसाठी अतिविशिष्ट मानधरांच्या हस्ते बक्षीस वितरण व बालगोपाळांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे बक्षीसाद्वारे वितरण केले जाईल. तसेच शालेय उपयोगी वस्तूचे सर्वोपस्थित बाल-गोपाळांना वितरण करणे व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन या कार्यक्रमाद्वारे सर्व जनतेसमोर सादर करून प्रोत्साहित करणे, हे या तान्हा पोळा उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.



💥 स्पर्धेचे नियम व वैशिष्ट्ये 💥
👉  सजावट करणाऱ्या स्पर्धकांना ४ बाय ४ चीच जागा मिळेल.
👉  स्पर्धकांनी त्या हिशोबानेच आपला देखावा निर्माण करावा.
👉  स्पर्धकांची नोंदणी ७ वाजेपर्यंत घेण्यात येईल, त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांची नोंदणी होणार नाही.



🙏 रिल्स स्पर्धा व आकर्षक बक्षिसे 🙏
या उत्सवांतर्गत ‘रिल्स स्पर्धा’ सुद्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांसाठी खालीलप्रमाणे बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत:
🏆पहिले बक्षीस :- ₹ ३००१/-
🏆दुसरे बक्षीस :- ₹ २००१/-
🏆तिसरे बक्षीस :-  ₹ १५०१/-
🙏 मान्यवरांची उपस्थिती 🙏
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. संतोष बाकल (एस.डी.पी.ओ., वरोरा) भूषवणार असून, उद्घाटक म्हणून मा. प्रतिभाताई धानोरकर (खासदार, चंद्रपूर-वणी आणि मतदार संघ) व मा. करणदादा देवतळे (आमदार, वरोरा भद्रावती मतदार संघ) उपस्थित राहतील. मुख्य अतिथी म्हणून मा. अर्चनाताई ठाकरे (नगराध्यक्ष, न.प.वरोरा) व मा. योगीताताई नेरकर (उपनगराध्यक्ष, न.प.वरोरा) लाभणार आहेत.मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास शहर तथा परिसरातील अनेक दिग्गज व प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत, ज्यामध्ये मा. ओमप्रकाश सोनटक्के (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वरोरा), मा. मुकेशभाऊ जिवतोडे, मा. रविभाऊ शिंदे, मा. विलासभाऊ टिपले, मा. संदेशबाबू चोरडीया, मा. एहतेश्याम अली, मा. अभिजित मणियार, मा. छोटूभाऊ शेख, मा. रमेशमामा मेश्राम, मा. बालाजी धोबे, मा. लखन केवानी, मा. काजल धोटे आणि मा. स्नेहल पत्तीवार यांचा समावेश आहे.

तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या उत्सवात वरोरा वासीयांनी व बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तान्हा पोळा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून, नोंदणीसाठी ☎️ 8055388355  किंवा  ☎️ 9604077707 या क्रमांकावर संपर्क साधावा.