खामगाव :-आजच्या मोबाईल युगात डिजिटल वर्कशॉप माध्यमांचा प्रभाव वेगाने वाढला असून, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य बनला आहे. याच पार्श्वभूमीवर समस्त युवा खामगाव तालुका यांच्या वतीने महिला, तरुण व्यावसायिक आणि भावी पत्रकारांसाठी एका विशेष ” डिजिटल वर्कशॉप “आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या मोबाईल तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून स्वतःची गुणवत्ता व व्यवसाय कसा वाढवावा, याबाबत या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल केवळ संवादाचे साधन राहिलेला नसून तो उद्योग, व्यवसाय, पत्रकारिता आणि शिक्षणाचे एक सशक्त माध्यम बनला आहे. स्मार्टफोनचा प्रभावी वापर करून घरबसल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणे, छोट्या उद्योगांना डिजिटल बाजारपेठेत पोहोचवणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे याविषयी या कार्यशाळेत मोलाचे धडे दिले जाणार आहेत.
💥 कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये 💥
दिनांक :- रविवार, २० सप्टेंबर २०२६,वेळ :-दुपारी १२ ते ३, स्थळ :- पत्रकार भवन , ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ, खामगाव, जि. बुलढाणा
मार्गदर्शक :- देवनाथ गंडाटे (पत्रकार तथा डिजिटल मीडिया अभ्यासक)
🙏 प्रवेश :- पूर्णपणे निःशुल्क
मोबाइल आणि इंटरनेटच्या या युगात मागे न राहता, डिजिटल साक्षरता आत्मसात करण्यासाठी महिला, तरुण व्यावसायिक, तसेच नवोदित पत्रकारांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त युवा खामगाव तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.




