Home Breaking News वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तांतर; डॉ. विजय देवतळे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव...

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तांतर; डॉ. विजय देवतळे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ५ मतांनी मंजूर.

वरोरा :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सभापती डॉ. विजय देवतळे यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर दणदणीत बहुमताने पारित झाला आहे. अत्यंत चुरशीच्या व नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या या विशेष सभेत विरोधकांनी आपली ताकद दाखवून देत तब्बल १२ मतांची आघाडी घेतली, तर सत्ताधाऱ्यांना केवळ ५ मते मिळवता आली.
बाजार समितीच्या सत्तेची सूत्रे हातात असलेल्या डॉ. विजय देवतळे यांच्या कारभाराविरोधात असंतोष वाढत गेल्याने हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मतदान प्रक्रियेत राजकीय समीकरणांचे पारडे पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले. विरोधकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपली रणनीती राबवत १२ सदस्यांची भक्कम मोट बांधली, तर डॉ. देवतळे यांना केवळ ५ सदस्यांचेच समर्थन राखता आले.



💥 पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया 💥
अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याची ही अधिकृत व कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर, सभेचा संपूर्ण अहवाल आणि इतिवृत्त पुढील मंजुर व कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे (कलेक्टर ऑफिस) तातडीने पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजिूर झाल्यानंतर आता वरोरा बाजार समितीच्या नवीन सभापती पदाच्या निवडीसाठीची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
या सत्तांतरामुळे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी राजकारणाला कलाटणी मिळाली असून, सभापती पदाच्या नवीन वर्णासाठी राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.