Home Breaking News संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा बडगा राजुरातील खळबळजनक हत्या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत...

संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा बडगा राजुरातील खळबळजनक हत्या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई!

चंद्रपूर :- संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा बडगा राजुरातील खळबळजनक हत्या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ठळक घटना :- राजुरा शहरातील सोम्नाथपूर वार्ड येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० च्या सुमारास भरदिवसा गोळ्या झाडून विनोद उर्फ पापा जनार्धन जाधव यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
गुन्हेगारांची पार्श्वभूमी :- या गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांची धडक कारवाई :- राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ६९५/२०२६ नुसार कलम १०३(१), ३(५) बीएनएस व शस्त्र कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजुरा पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९’ (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
अटकेतील आरोपी :- मुख्य हल्लेखोर करण दिपक बावीस्कर याच्यासह कट रचणारे, तसेच अप्रत्यक्ष मदत करणारे परवेझ सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ उर्फ भुर्जी उमेश खामनकर यांना अटक करण्यात आली आहे.
जप्ती :- आरोपींकडून एकूण ३ अग्नीशस्त्रे, ३ रिकाम्या मॅग्झीन आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
यशस्वी कामगिरी :- पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन चिंचोलकर, पोउपनि सुरेख उपरे व पोहेकॉ कैलास आलाम यांनी ही कारवाई पार पाडली.