मुंबई :-खरीप हंगाम 2026 मध्ये कमी पाऊस व पिकांची गंभीर हानी लक्षात घेऊन राज्य शासनाने अखेर मोठा निर्णय घेत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना महसूल सवलतीपासून वीजबिल, कर्ज, शिक्षण आणि रोजगार हमीपर्यंत 12 महत्त्वाच्या सवलती लागू होणार आहेत.
💥 पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश 💥कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वेक्षण करताना छायाचित्रे आणि GPS समन्वयांकासह पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे त्वरित पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
💥 शेतकऱ्यांना मिळणार या 12 सवलती💥
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पुढील उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
* जमीन महसुलात सूट.
* पीक कर्जाचे पुनर्गठन.
* शेती कर्ज वसुलीस स्थगिती.
* 7.5 हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट.
* शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफी.
* रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करणे.
* आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याचे पाणी.
* टंचाईग्रस्त गावांमध्ये शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.
* शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याचा पुरवठा.
* जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे.
* जलसंधारणाची कामे सुरू करणे.
* पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या पाण्याचे नियोजन.
💥 नुकसानभरपाईबाबत स्वतंत्र निर्णय💥
शासनाने स्पष्ट केले आहे की, शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाईल.
💥 चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुके दुष्काळग्रस्त💥
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात 12 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये:
👉 चंद्रपूर
👉 भद्रावती
👉 गोंडपिंपरी
👉 राजुरा
👉 कोरपना
👉 मूल
👉 वरोरा
👉 सावली
👉 चिमूर
👉 नागभीड
👉 सिंदेवाही
👉 पोंभूर्णा
या तालुक्यांमध्ये शासनाच्या सर्व दुष्काळी सवलती लागू राहणार आहेत. विदर्भातील यवतमाळ (16), नागपूर (14), अमरावती (14), वर्धा (7), अकोला (7), वाशीम (6), चंद्रपूर (12) आणि गडचिरोली (2) यांसह अनेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या नजरा आता पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या स्वतंत्र शासन निर्णयाकडे लागल्या असून, प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




