चंद्रपूर, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चंद्रपूर शहर परिसरातून २ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीची एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान निष्पन्न झाले की, जप्त करण्यात आलेली मोटारसायकल नागपूर ग्रामीणमधील पोलीस ठाणे वाडी येथे दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे वाडी येथे अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंद आहे.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये
उघडकीस आलेला गुन्हा :- पोलीस ठाणे – वाडी, जिल्हा नागपूर
अपराध क्रमांक व कलमे :- अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता
जप्त मुद्देमाल :- हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (नोंदणी क्र. MP-20-MH-8135, अंदाजे किंमत ₹५०,०००/-)
💥 ताब्यात घेण्यात आलेले आरोपी 💥
१) गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर (वय २७ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर)
२) यमला तंगराज कोरवान (वय ३५ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर)
सदर दोन्ही आरोपींना आणि जप्त केलेली मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर अंतर्गत असलेल्या चंद्रपूर उपविभाग पथकाने पार पाडली आहे.




