वरोरा :- समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इनर व्हील क्लब वरोरा आणि रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
🙏 पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश 🙏
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, इनर व्हील व रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हरित उद्यानातील एका झाडाला मोठी राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा एक संदेश देण्यात आला. “रक्षण करणाऱ्या हातांना प्रेमाची आणि सन्मानाची राखी” या भावनेतून साजरा झालेला हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
पोलिसांप्रती कृतज्ञता :- समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या समर्पित फेवेला सलाम करण्याचा हा एकछोटासा प्रयत्न होता.
भावनिक संदेश :- रक्षाबंधनाच्या माध्यमातून राखीचे नाते केवळ भावंडांपुरते मर्यादित नसून, समाजाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेले असते, हा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच दोन्ही क्लबांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 उपस्थित प्रमुख पदाधिकारी व सदस्य 🙏
याप्रकरणी रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष विक्की आगलावे व उपाध्यक्ष, तसेच इनर व्हील क्लब वरोराच्या अध्यक्षा स्नेहल पत्तीवार , उपाध्यक्ष प्रतिभा मणियार , सचिव प्राजक्ता कोहळे , प्रिया टोंगे , दर्शना मोदी , सीमा लाहोटी नीलिमा गुंडावार , सारिका बावणे , वैशाली चहारे, किरण जाकोटिया , कविता बाहेती , दिपाली माटे आदी सभासद उपस्थित होते. या सुंदर व प्रेरणादायी उपक्रमामुळे पोलीस बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.




