वरोरा :-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आणि स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाकडे (२०४७) वाटचाल करताना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी आणि तिरंगा हाती घेऊन राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी वरोरा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) वरोराच्या वतीने ही रॅली काढण्यात येणार आहे. वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करनदादा देवतळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी च्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहर अनिकेत नाकाडे यांच्याकडे आहे कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. अनिकेत नाकाडे ☎️ 9763326176
रॅलीचे आयोजन ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली.
दिनांक व वेळ :- गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६, दुपारी २.०० वाजता.
👉 रॅलीचा मार्ग व ठिकाणे
💥 प्रारंभ :- श. योगेश डाहूले स्मारक.
💥 मार्ग :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पद्मावार चौक, नेहरू चौक, मित्र चौक, डोंगरवार चौक, सराफा लाईन, वीर सावरकर चौक आणि ज्योतिबा फुले चौक.
💥 समारोप :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे.
भारतीय जनता पार्टी, वरोरा




