वरोरा :- पवित्र आषाढी एकादशीच्या मंगलमय निमित्ताने वरोऱ्यातील मोठ्या विठ्ठल मंदिरातून अत्यंत उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या धार्मिक व उत्साही सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी व भक्तगण यांच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील मुख्य नेहरू चौकात केळी व फ्रूटीचे वाटप करण्यात आले. या सामाजिक व धार्मिक उपक्रमाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
मान्यवरांची व पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती
या सेवाभावी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संयोजक संजय गयनेवार आणि राहुल बांदुकर यांनी केले होते. विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी आणि शोभायात्रेच्या स्वागतासाठी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नेहरू चौकात उपस्थित होते.उपस्थित प्रमुख मान्यवर या कार्यक्रमात वरोरा शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष पवार, नगरसेवक अक्षय भिवधरे , नगरसेवक प्रवीण चिमूरकर , अनिकेत नाकाडे , दिलीप घोरपडे , अजित नरडे , संजय दानव , अमित आसेकर , स्वप्निल देवाळकर , प्रशांत उलमाले , जगदीश तोटावार , सचिन तडस ,अमोल शेंडे , विशाल बलगेवार, रवि तुरानकर , वैभव बोन्डे तसेच महिला नगरसेविका सीमाताई तडस , आशा आसेकर , मनीषा दानव आदींसह अनेक आदरणीय नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाले होते.
आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे आषाढी एकादशीच्या आनंदात आणखी भर पडली असून, वरोरा शहरात सर्वत्र विठ्ठलमय आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.




