Home जिल्हा वरोऱ्यात स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी ‘स्टडी पॉईंट अकॅडमी’चा भव्य उद्घाटन सोहळा...

वरोऱ्यात स्पर्धा परीक्षा व व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी ‘स्टडी पॉईंट अकॅडमी’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

वरोरा :- ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल आवड निर्माण करून त्यांना योग्य व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने वरोऱ्यात ‘स्टडी पॉईंट अकॅडमी’ ची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा आज रविवार, २६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०५ वाजता उत्साहात पार पडला.



आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून स्टडी पॉईंट अकॅडमीतर्फे विविध मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहेत, ज्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे होईल.



🙏 मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न 🙏
या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजय देवतळे यांच्या शुभहस्ते या अकॅडमीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिमूर येथील समाजकार्य बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका श्रीमती निलिमा तळवेकर(लोनकर)यांनी भूषविले.
तसेच, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वरोऱ्याचे नायब तहसीलदार  श्री. उल्हास लोखंडे आणि समुद्रपूर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. ज्ञानेश्वर सावसाकडे, दत्ताभाऊ बोरीकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाचे स्थळ:-स्टडी पॉईंट अकॅडमी, अहेतेशाम अली कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, रुम क्र. ११, आनंदवन चौक (सिद्धकला लॉन समोर), वरोरा येथे हा सोहळा पार पडला. या उद्घाटन प्रसंगी परिसरातील अनेक विद्यार्थी, पालक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांची उपस्थिती हीच आयोजकांसाठी प्रेरणा व शुभाशीर्वाद ठरेल, असा विश्वास स्टडी पॉईंट अकॅडमी, वरोरा च्या वतीने व्यक्त करण्यात आला.