Home जिल्हा कारगिल विजय दिवस निमित्त वरोऱ्यात वीर जवानांना अभिवादन; आजी-माजी सैनिकांचा गौरव!

कारगिल विजय दिवस निमित्त वरोऱ्यात वीर जवानांना अभिवादन; आजी-माजी सैनिकांचा गौरव!

वरोरा :-“स्मृती हुतात्म्यांच्या, कृतज्ञता पराक्रमाची.” या भावनेने वरोरा येथे कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वरोरा येथील शहीद जवान योगेश डाहुले शहीद स्मारक येथे कारगिल युद्धातील अमर शहीदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.



कारगिल युद्धात ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर अद्वितीय शौर्य गाजवले, अशा युद्धात सहभागी असलेल्या आजी-माजी सैनिकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भूषणावह व प्रेरणादायी ठरला.



या भावूक व प्रेरणादायी कार्यक्रमास वरोरा- भद्रावती मतदारसंघाचे आमदार मा. श्री. करणदादा देवतळे, नगर परिषद वरोराच्या नगराध्यक्ष सौ. अर्चना आशिष ठाकरे, भद्रावतीचे नगराध्यक्ष श्री. प्रफुल चटकी यांच्यासह शहरातील मान्‍यवर, नागरिक आणि मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक उपस्थित होते.



शूरवीरांच्या या असीम शौर्यामुळे, त्यागामुळे आणि समर्पणामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. जवानांचे हे बलिदान संपूर्ण देशाला कायम प्रेरणा देत राहील, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
“जय हिंद! जय भारत!”