Home जिल्हा आणीबाणीच्या ‘काळ्या पर्वा’चे वरोऱ्यात स्मरण; लोकशाही रक्षणासाठी भाजपचा निर्धार; सन्मानितांचा सत्कार

आणीबाणीच्या ‘काळ्या पर्वा’चे वरोऱ्यात स्मरण; लोकशाही रक्षणासाठी भाजपचा निर्धार; सन्मानितांचा सत्कार

वरोरा :- वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात आज भारतीय जनता पक्ष, वरोरा यांच्या वतीने आज दिनांक २५ जून २०२६ रोजी ‘आणीबाणी दिन’ (काळा दिवस) निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या आणीबाणीच्या त्या काळ्या अध्यायाचे स्मरण करत, लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्याचे जतन करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांसाठी लढा देताना ज्यांना तुरुंगवास सोसावा लागला, अशा लढवय्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.




सत्कारमूर्ती :-कार्यक्रमात खालील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
१) श्री. बाबासाहेबजी भागडे
२) श्री. अविनाशजी नेवासकर सर
३) श्री. विकासजी वसंतराव घुडे
४) श्री. संजयजी वसंतराव घुडे
५) श्री. किशोर शामरावजी आसेकर
६) श्रीमती वंदना सुधाकर भोयर.




कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित व मार्गदर्शन :-
वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्र येथील  आमदार श्री. करणदादा देवतळे यांच्या ‘पुष्पांजली’ निवासस्थानी (आनंदवन चौक, गजानन नगर) दुपारी १२:०० वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते.




अध्यक्षस्थानी :- डॉ. भगवानजी गायकवाड (भाजप ज्येष्ठ नेते) प्रमुख उपस्थिती :- श्री. बाबासाहेब भागडे (भाजप ज्येष्ठ नेते) प्रमुख उपस्थिती :- विजय मोकाशी (शेतकरी खरेदी विक्री अध्यक्ष, वरोरा)  यांची विशेष उपस्थिती लाभली.संचालन व आभार :- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष श्री. संतोष पवार (नगरसेवक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाजप IT सेल श्री. राहुल दागमवार यांनी केले.




लोकशाही रक्षणाचा संकल्प :-
आणीबाणीचा तो काळ म्हणजे भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात होता. हा काळा अध्याय पुन्हा कधीही येऊ नये आणि देशातील संविधान व स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संतोष पवार, श्रीमती लीलाताई बोंडे (शहराध्यक्ष, महिला आघाडी) आणि श्री. अनिकेत नाकाडे (शहराध्यक्ष, भाजयुमो) यांच्यासह भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी दिलीप घोरपडे, प्रशांत उलमाले, संजय राम, रमेश परबत, अमोल देऊळकर, ओम यादव, महेश उपाध्ये,  अमित आसेकर, अजय राखुडे, जिवन काकडे, डेहनकर, मोहन रणदळ आणि सुनिल समर्थ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.