Home Breaking News चंद्रपुरात हायप्रोफाईल देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा थरारक छापा; ‘हॉटेल रिलॅक्स’मध्ये सुरू असलेल्या काळ्या...

चंद्रपुरात हायप्रोफाईल देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा थरारक छापा; ‘हॉटेल रिलॅक्स’मध्ये सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश!

चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन पीडित महिलांची सुटका, ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक मालक ताब्यात,दुसरा फरार. चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात असलेल्या ‘हॉटेल रिलॅक्स रूम अँड लॉजिंग’मध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून एक मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे शहरात आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान देहव्यापाराच्या विळख्यातून दोन पीडित महिलांची सुटका केली असून, एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. तर दुसरा मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
👉 बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा ‘सापळा’ यशस्वी!वडगाव परिसरातील ‘हॉटेल रिलॅक्स’ येथे महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने रणनीती आखली. पोलिसांनी हॉटेलवर एक बनावट ग्राहक (पंटर) पाठवून खात्री केली. जशीच काळ्या धंद्याची खात्री पटली, तशीच दबा धरून बसलेल्या महिला पंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या (AHTU) संयुक्त पथकाने हॉटेलवर थेट छापा टाकला.

👉 बाप-लेकाचा काळा कारनामा ? ७ हजार ४०० चा मुद्देमाल जप्त !
छाप्यादरम्यान हॉटेलमध्ये दोन व्यक्ती महिलांकडून देहव्यापार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. सावजी पांडुरंग हस्तक (वय ७४, रा. वडगाव, चंद्रपूर) आणि प्रदीप सावजी हस्तक (वय ३०, रा. वडगाव, चंद्रपूर) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन, रोख रक्कम, कंडोम बॉक्स, रजिस्टर आणि क्यूआर कोड (QR Code) असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सावजी हस्तक याला जागीच ताब्यात घेतले असून, त्याचा फरार मुलगा/भागीदार प्रदीप हस्तक याचा शोध रामनगर पोलीस घेत आहेत. दोन्ही पीडित महिलांची सुटका करून त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.
🙏 रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल 🙏
या गंभीर प्रकरणाची नोंद करून रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (PITA) अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.
👉 या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली धडक कारवाई :-सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, दिपक डोंगरे, कार्तिक खनके, पोअं किशोर वाकाटे, प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, मपोहवा छाया निकोडे, मपोहवा निराशा तितरे, मपोहवा विजयमाला वाघमारे, मपोशि अपर्णा मानकर, चालक पोहवा प्रमोद दंभारे, मिलिंद टेकाम तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या टीमने अत्यंत चोख कामगिरी बजावली.

🙏 जय विदर्भ 🙏