नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषद नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया अत्यंत वेगात आणि निरंतर सुरू आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी ‘पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख’ माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि सुशिक्षित नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
👉 फॉर्म त्वरित कार्यालयात जमा करण्याचे आदेश
आपल्या जिल्हा किंवा विधानसभा क्षेत्रातील गोळा झालेले सर्व नोंदणी फॉर्म त्वरित मुख्य कार्यालयात जमा करून सहकार्य करावे, अशी सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. एकही पात्र पदवीधर मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भाजपच्या वतीने सूक्ष्म नियोजन केले जात आहे.
👉 मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (checklist)
नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अर्जदारांनी खालील कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे:
फोटो, आयडी साईझ रंगीत फोटो (१)ओळखपत्र, आधार कार्ड व मतदान कार्ड शैक्षणिक पात्रता पदवी (डिग्री) प्रमाणपत्र किंवा समकक्ष पदविका (डिप्लोमा)
गुणपत्रिका :- पदवी प्रमाणपत्र अथवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका
👉 नावात बदल असल्यास :- राजपत्र (गॅझेट) किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
👉 इतर :- पॅनकार्ड
✴️”सुशिक्षित आणि पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील सर्व फॉर्म त्वरित कार्यालयात जमा करून या प्रक्रियेला गती द्यावी.”सुधाकर लीलाबाई विठ्ठलराव कोहळे(पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख, नागपूर विभाग व माजी आमदार, दक्षिण नागपूर २०१४-२०१९)
“या मोहिमेत अधिकाधिक पदवीधरांनी नोंदणी करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन भाजप महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.”
👉”महाराष्ट्र विधान परिषद नागपूर
विभाग पदवीधर मतदार संघ २०२६
आपले लाडके आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात पदवीधर मतदार नोंदणी सुरू आहे तरी जास्तीत जास्त पदवीधर मतदान नोंदणी करावी ही विनंती.
संपर्क भाजपाचे :-अध्यक्ष संतोष पवार शहर अध्यक्ष तथा नगरसेवक. ☎️ :- 8308911011
🙏 जय विदर्भ 🙏




