चंद्रपूर :-राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव वि. भोंगळे यांच्या विशेष पुढाकारातून आणि ‘एस.आर. ट्रस्ट’ (SR Trust) व ‘एलिम्को’ (ALIMCO) यांच्या संयुक्त माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात दिव्यांग बांधवांसाठी एका भव्य व अत्यंत महत्त्वाच्या ‘कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या माध्यमातून क्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणांचे पूर्णपणे मोफत मोजमाप व वितरण केले जाणार असून, आमदार भोंगळे यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दिव्यांग बांधवांचे जीवन सुकर व्हावे आणि त्यांना समाजात सन्मानाने जगताना शारीरिक स्वावलंबन मिळावे, या उदात्त हेतूने या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मतदारांच्या सोयीसाठी हे शिबिर एकाच ठिकाणी न ठेवता मतदारसंघातील चारही प्रमुख तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना आयोजित केले गेले आहे.
🗓️ असे आहे शिबिराचे सविस्तर वेळापत्रक:-
सर्व शिबिरांची वेळ,सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत असेल.
1.गोंडपिपरी तालुका :-दिनांक :-सोमवार, २५ मे २०२६
👉 स्थळ :-पंचायत समिती, गोंडपिपरी.
2. राजुरा तालुका :-दिनांक :-गुरुवार, २८ मे २०२६
👉 स्थळ :- पंचायत समिती, राजुरा.
3. जिवती तालुका :-दिनांक :- शुक्रवार, २९ मे २०२६
👉 स्थळ :-पंचायत समिती, जिवती.
4. कोरपना तालुका :-दिनांक :- शनिवार, ३० मे २०२६
👉 स्थळ :- पंचायत समिती, कोरपना.
📋 लाभासाठी ‘ही’ कागदपत्रे आहेत आवश्यक !
शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी खालील कागदपत्रांच्या दोन (२) झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे:
1. दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड)
2. आधार कार्ड.
3. रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला.
🙏 प्रशासनाचे लाभणार भक्कम सहकार्य 🙏
या भव्य जनहितार्थ उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय चंद्रपूर, संबंधित पंचायत समित्या, नगरपंचायत/नगरपालिका, सर्व शासकीय यंत्रणा (चंद्रपूर) व दिव्यांग कौशल्य विकास संस्था (चंद्रपूर) यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
📞 अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क :-
शिबिरासंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास दिव्यांग बांधव व त्यांच्या नातेवाईकांनी ☎️ 7709745279, ☎️ 7721982384 ☎️ 9322900847 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
👉 आवाहन :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी, गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन आमदार देवराव वि. भोंगळे व एस.आर. ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




