वरोरा :-
वरोरा-माढेळी मार्गावरील चुरूरखटी परिसरात अपघाताच्या घटनेने उग्र रूप धारण केले असून, एका तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने ‘श्री जय गिरनारी कन्स्ट्रक्शन’ कंपनीच्या कार्यालयावर चाल करून भीषण तोडफोड केली. या राड्यामध्ये कंपनीचे सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, चिथावणी देणाऱ्या तिघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
🛑 नेमकी घटना काय 🛑
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका आयशर हायवा ट्रकने ( क्र. MH 34 CQ 1484 ) एका व्यक्तीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मृताचे नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने कंपनीच्या कॅम्पसमोर जमा झाले.
🛑 कार्यालयात घुसून तोडफोड आणि दहशत 🛑
जमावातील काही जणांनी चिथावणी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. लाकडी दांडे आणि दगडांच्या साहाय्याने जमावाने कार्यालयावर हल्ला चढवला. यामध्ये :👇
४ हायवा ट्रक , १ ग्रेडर आणि १ पोकलॅन मशीन च्या काचा तसेच हेडलाईट फोडण्यात आल्या.
👉 कार्यालयातील कुलर, खुर्च्या आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली.
👉 वाहनांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला, मात्र वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.
🛑 पोलिसांची कडक कारवाई 🛑
या हिंसाचारप्रकरणी श्रीकांत टोंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी बंटी कुमरे, खुशाल बनसिंगे आणि विजय मोडक (सर्व रा. नांदरा) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये (कलम ४९, ३२४(५), ३५१(३), ३५२ आणि ११५/२) गुन्हा दाखल केला आहे.
🛑 तपासाची चक्रे फिरली 🛑
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वरोरा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. “कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांनी मृत तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




