Home जिल्हा वरोरा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगरसेविका सौ. वर्षा पिसाळ आक्रमक; आमदार करणदादा...

वरोरा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगरसेविका सौ. वर्षा पिसाळ आक्रमक; आमदार करणदादा देवतळे यांच्याकडे निधीची मागणी

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. या समस्येची गंभीर दखल घेत वरोरा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वर्षा मंगेश पिसाळ यांनी पुढाकार घेतला असून, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांना लेखी पत्र दिले आहे.
👉 पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची गरज.
आमदारांना दिलेल्या पत्रात वर्षा पिसाळ यांनी नमूद केले आहे की, शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पाणी साचून डबकी तयार होतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या खराब रस्त्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
👉 निधीची मागणी केलेली प्रमुख कामे
नगरसेविका पिसाळ यांनी दोन वेगवेगळ्या पत्रांद्वारे एकूण तीन मुख्य विकासकामांसाठी १००० मीटर आणि ५००-५०० मीटर अशा लांबीच्या कामांचे प्रस्ताव मांडले आहेत:
१.सरदार पटेल वॉर्ड (प्रभाग क्र. २) दिलीप वरभे ते गजानन कोतळे, गजानन कोतळे ते मंजुळकर (वडार मोहल्ला) आणि मंजुळकर ते विलास बोरकर यांच्या घरापर्यंत नाली व सिमेंट-काँक्रीट रस्ता बांधणे. तसेच लाखे ते जयंत आंबेकर यांच्या घरापर्यंत नाली, काँक्रीट आणि पेव्हिंग ब्लॉक बसवणे. (अंदाजे १००० मीटर).
२. वसंत नगर (प्रभाग क्र. २) तराळे सर ते चिडे सर, निशी डफ सर ते वानखेडे साहेब, आणि जाधव ते देशमुख, नितीन पिसाळकर ते पिंपळकर सर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, पक्की नाली व पेव्हिंग ब्लॉकचे काम करणे. (अंदाजे ५०० मीटर).
३. विद्यानगरी (प्रभाग क्र. २) विद्यानगरी कॉलनी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड व पाईप पॅक बंद नाली बांधणे. (अंदाजे ५०० मीटर).
नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या
या मागणी पत्रावर आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी स्वाक्षरी करून पत्राचा स्वीकार केला आहे. आता आमदार करण देवतळे या विकासकामांसाठी किती लवकर निधी मंजूर करतात, याकडे प्रभाग क्र. २ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे मार्गी लागल्यास वरोरावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🙏 जय विदर्भ 🙏