वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
निलजई, आमडी, नवीन सोईट आणि नवीन रोडच्या नूतनीकरणाचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. **जय गिरनारी कन्ट्रक्शनचे मालक बसंत सिंग यांच्यामार्फत करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले असून, तयार झालेला रस्ता केवळ चार दिवसांतच उखडायला सुरुवात झाली आहे. यामुळे कंत्राटदाराने शासनाच्या निधीचा चुना लावत जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप होत आहे.
🔴 डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ ‘काळा थर’🔴
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर डांबरीकरण करताना नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. रस्त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरिअल अतिशय सुमार दर्जाचे असून, डांबराऐवजी ‘चूरी’ आणि ‘वेस्टेज ऑईल’चा (Used Oil) वापर करून रस्ता थातूरमातूर चकाकणारा करण्यात आला. मात्र, कंत्राटदाराचा हा ‘बनावट’ विकास चार दिवसही टिकू शकला नाही.
🔴रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’🔴
नवीन रस्ता झाला म्हणून समाधान व्यक्त करणाऱ्या वाहनधारकांना आता खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा वरचा थर हाताने उपटला जात आहे. “डांबरीकरणाच्या नावावर फक्त काळे तेल ओतण्याचे काम कंत्राटदाराने केले आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
🔴जनतेचे सवाल आणि प्रशासनाचे मौन*🔴
👉 कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्ता चार दिवसांत कसा उखडतो?
👉 निकृष्ट काम होत असताना संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष का केले ?
👉 जय गिरनारी कन्ट्रक्शन आणि मालक बसंत सिंग यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊन रस्ता पुन्हा नव्याने करून मिळेल का ?
निलजई आणि परिसरातील नागरिकांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर संबंधित कंत्राटदारावर कारवाई झाली नाही आणि दर्जेदार रस्ता तयार झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ब्युरो रिपोर्ट: स्वतंत्र विदर्भ न्यूज, पोर्टल वरोरा.
🙏 जय विदर्भ🙏




