कोंढा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन — हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम

भद्रावती ✍️अभिषेक भागडे (ता. ११ नोव्हेंबर २०२५) :
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराजजी भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या उपक्रमांमध्ये समाजसेवेचा संस्कार आणि लोककल्याणाचा भाव स्पष्टपणे दिसून आला.

या निमित्ताने कोंढा गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार करणभाऊ देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबिरामध्ये आरोग्य सेवा वाहनाच्या माध्यमातून विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करून उपचाराची सुविधा देण्यात आली.

गावकऱ्यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असून पक्षाच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक व्यक्त केले. नागरिकांनी सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती वाढते व लोकांमध्ये वैद्यकीय तपासणीची सवय लागते.

या शिबिराद्वारे समाजातील सर्व घटकांप्रती प्रेम, आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीची भावना व्यक्त करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचा “सेवा, संवेदना आणि समाजासाठी समर्पण” हा संस्कार या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रसंगी माजी शहर महामंत्री प्रशांतजी डाखरे, तालुकाध्यक्ष श्यामसुंदरजी उरकुडे, मंगेशजी मत्ते, तसेच कोंढा पंचायत समितीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( बातम्या आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711=8329889732)

—🙏 जय विदर्भ 🙏—