विकासाभिमुख कार्य करण्यासाठी जनता भाजपच्या पाठीशी — आमदार देवराव भोंगळे
आंबेझरी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश
✍️ जिवती (ता. ११ नोव्हेंबर) :
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पाठीशी उभी आहे. नागरिकांचा विश्वास, अपेक्षा आणि समर्थन आमच्या कार्याला अधिक गती देणारे आहे. गावागावात मूलभूत सुविधांचा विस्तार करणे हा आमचा मुख्य अजेंडा असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे. यासाठी भाजपाचे सरकार सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती तालुक्यातील आंबेझरी येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रसंगी आमदार भोंगळे बोलत होते.
आमदार भोंगळे पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांचा धडाका सुरू आहे. सर्वांगीण विकासासाठी जनता आता भाजपच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भोंगळे म्हणाले की, “भाजप हा विकास आणि जनहिताचा पक्ष आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय आणि सुविधा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज नव्याने आमच्या परिवारात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षसंघटना अधिक सक्षम होईल.”
या कार्यक्रमात भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये भीमराव आत्राम, अर्चना शिंदे, शोभा मडावी, रामचंद्र सलगर, रामराव नंदेवार, धर्मा मडावी, आनंदराव आत्राम, प्रकाश शिंदे, हनुमान नंदेवार, विलास कंदीलवार, पांडुरंग नंदेवार, बापूराव आत्राम, गणपत सलगर आदींचा समावेश आहे.
आमदार देवराव भोंगळे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या ध्येय-धोरणांची माहिती देत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, तालुका महामंत्री गोविंद टोकरे, शहराध्यक्ष राजेश राठोड, तुकाराम वारलवार, अंबादास कंचकटले, चंद्रकांत घोडगे, आनंद कदम, संतोष जाधव, पुंडलिक गिरमाजी, भीमराव पवार, विठ्ठल चव्हाण, रामराव राठोड, सूर्यभान मडावी, दत्ताजी बावणे, पुंजाराम कोटरंगे, भिकाजी कोटरंगे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठोड यांनी केले तर आभार गोविंद टोकरे यांनी मानले.
—🙏 जय विदर्भ🙏— अभिषेक भागडे.रा.वरोरा. चंद्रपूर
( बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा ☎️9673574711=8329889732)




