विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळं महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर बंड पुकारलं होतं. राज्यभरात 150 पेक्षा जास्त उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळं पक्षातील नेत्यांची आणि अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढल्या होत्या. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, आणि पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी कमी झाली. या दरम्यान पक्षांनी अनेक नेत्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
Related News

राजकारण · 27 October 2026
पाठपुराव्याला यश! दिंडोडा – बामर्डो – माढेळी रस्ता दुरुस्तीच्या कामाचा अखेर धडाक्यात प्रारंभ
माजी सैनिक सचिन धात्रक यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला जाग; नागरिकांमधून आनंद व्यक्त! माढेळी (प्रतिनिधी)…

राजकारण · 23 October 2026
आर्णी-केळापूर मतदारसंघातील पाणीप्रश्न तातडीने सोडवा आमदार राजूभाऊ तोडसाम यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
यवतमाळ :- आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघासह घाटंजी शहरात भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा. श्री.…

राजकारण · 10 October 2026
सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह महसूलमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा
दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही; १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश मुंबई :- राज्यात…

राजकारण · 7 October 2026
आर्णी-केळापूरच्या विकासासाठी आमदार राजूभाऊ तोडसाम सक्रीय!
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट; सिंचन व विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा आर्णी :- आर्णी-केळापूर विधानसभा…
