मुंबई (Mumbai) :- मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज (Maratha Reservation) जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेत.
शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या निर्णयामागे मी भक्कमपण उभा राहिलोय, जाणीवपूर्वक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना जर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण करतोय असं वाटलं तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, आणि मी राजकारणातून सन्यास घेईन’ असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलं आहे.




