नवी दिल्ली, 18 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंटस मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर कारवाई केली आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. तसेच 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सामन्यातील शिष्ठाचार मोडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. बीसीसीआयने हार्दिक पांड्यासह मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केल्याची माहिती मिळतेय.
मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. याच सामन्यात हार्दिक पांड्या स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला असून त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा आयपीएल 2025 सुरू होईल तेव्हा हार्दिक पांड्या पहिला सामना खेळू शकणार नाही.



