अमरावती: वाठोडा शुक्लेश्वर गावाला सध्या विश्रोळी पाणीपुरवठा योजने मधून पाणी पुरवठा होत आहे. चुकीच्या नियोजन पद्धतीमुळे गावाला पाण्याचा पुरवठा सहा ते सात दिवसातून एकदा होत आहे. आपल्या गावासाठी पाण्याचा प्रश्न भीषण झालेला आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने आज बुधवार रोजी सकाळी १० वाजता संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात धामोरी येथील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी काही तासासाठी भरउन्हात गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनही केले व मडके फोडत जीवन प्राधिकरणाचा निषेधही केला .
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्रामुख्याने सर्व गावामधील वार्डामध्ये पाणी पुरवठा होत नाही. त्याचबरोबर संपुर्ण गावा मध्येच दहा दिवसा नंतरपाणी पुरवठा होत असल्यामुळे गावातील नागरीकांना विहीर व नदीतील पाण्याचा वापर(Use of well and river water)करावा लागत आहे. त्यामुळे अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. हा सर्व प्रकार पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जी पणा मुळे होत आहे. असा आरोप संतोष महात्मे यांनी यावेळी केला.
धामोरी गावात एक दिवसा आड पाणी पुरवठा होतो व वाठोडा शुक्लेश्वर व इतर गावी विसरोळी प्रकल्पामध्ये येत असुन या गावामध्ये पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसा मध्ये करण्यात येतो. तरी वाठोडा शुक्लेश्वर या गावावर एवढा अन्याय का याचीत्वरीत दखल घेउन आम्हाला दोन दिवसाच्या आड पाणी पुरवठा मिळण्यात यावा जेणे करुन विसरोळी प्रकल्पामध्ये काम करीत असलेले कर्मचारी व अधिकारी यांना दूरध्वनी वरुन विचारले असता टाकीची लेवल होत नसल्यमुळे पाणी पुरवठा होत नाही असे सांगण्यात येत आहे. यामुळे वाठोडा शुक्लेश्वर येथे पाणी पुरवठा जाणीव पुर्वक कमी करुन भातकुली या भागात जास्त प्रमाणात सोडण्यात येत असल्यामुळे वाठोडा शुक्लेश्वर सह इतर गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात कितेक वर्षापासुन निवेदन दिले जात असुन त्यावर आता पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात भर उन्हात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी चक्का जाम स्थळी भेट देत संतोष महात्मे यांच्या सोबत चर्चा केली व दोन दिवसाची वेळ मागितली. त्यानंतर हा चक्काजाम मागे घेण्यात आला. यावेळी शेख अनिस,मकसूद अली,अनिस अली,रुजू बोळखे ,प्रजवळ यावले राजू बुरघाटे श शेकडो गावकरी उपस्थित होते.



