चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चंद्रपूर शहरात अमली पदार्थांच्या बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरुद्ध राबवलेल्या तीव्र मोहिमेत बल्लारपूर-बामणी मार्गावर मोठी कारवाई केली आहे. ओडिसा राज्यातून आणलेला सुमारे ५.०४९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, दोन जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.
५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम तथा जिओ सेंटर परिसरात गस्त घालत असताना, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीकडे जाणाऱ्या संशयितांना हटकून चौकशी केली असता त्यांच्याकडे ५.०४९ किलो गांजा आढळून आला.आरोपींचा तपशील.
💥 मंगेश संतोष उंदीरवाडे (वय २२ वर्षे, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली)
💥 सागर बाबूराव मरगडे (वय १५ वर्षे, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा)
🔳 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 🔳
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५.०४९ किलो गांजा, दोन मोबाईल फोन, रोख १,८०० रुपये आणि वाहतुकीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण अंदाजे ३,३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिसा राज्यातून आणल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे ‘गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act)’ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली या पथका सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकार, पोहवा सतीश अवधारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लाले यादव, पोहवा संदीप, पोहवा प्रफुल गारघाटे, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे, पोअं. इशार्क बदामवार, चा.पो.अ. मिलिंद टेकाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोहवा कार्तिक कणके यांच्या पथकाने पार पाडली.




