भद्रावती :- भद्रावती शहरामध्ये महावितरण कार्यालयाद्वारे सुरू असलेली स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, या प्रमुख मागणीसाठी नगर परिषद भद्रावतीचे नगरसेवक तथा सभापती नियोजन व विकास समिती प्रभागाचे राहुल सदाशिव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयातील उपअभियंता साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.
💥 निवेदनातील ठळक मुद्दे 💥
👉 महावितरण कार्यालयाद्वारे भद्रावती शहरामध्ये स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे.
👉 स्मार्ट मीटरच्या वापरामुळे गरीब व सामान्य जनतेवर खूप मोठा आर्थिक परिणाम होणार असून, या मीटरद्वारे महागडे भूदंड सामान्य जनतेवर येणार आहेत.
👉 भद्रावती शहरामध्ये लावले जाणारे स्मार्ट मीटर त्वरित काढावे आणि कोणालाही स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजभाऊ सारगधर आणि नगरसेवक संतोषभाऊ कुरेकार यांच्यासह लोक सभा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या निवेदनाची प्रत तहसीलदार साहेब (भद्रावती) आणि पोलीस निरीक्षक साहेब (भद्रावती) यांनाही पाठवण्यात आली आहे.




