Home जिल्हा देशसेवेच्या रक्षकांप्रती कृतज्ञता! आनंद निकेतन महाविद्यालयात एनसीसी व एनएसएसच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात...

देशसेवेच्या रक्षकांप्रती कृतज्ञता! आनंद निकेतन महाविद्यालयात एनसीसी व एनएसएसच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला रक्षाबंधन कार्यक्रम

वरोरा :- महाराोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे एनसीसी (NCC) व एनएसएस (NSS) च्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत प्रेरणादायी आणि देशभक्तीपर वातावरणात ‘रक्षाबंधन कार्यक्रम’अत्यंत दणक्यात आणि दिमाखात संपन्न झाला.



🙏 देशाच्या रक्षकांना आदरांजली 🙏
“एक राखी आपल्या माजी सैनिक दादा, माजी पोलीस दादा आणि माजी होमगार्ड दादा साठी” या उदात्त थिमवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणाची बाजी लावून सीमा व कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या माजी सैनिक , पोलीस व होमगार्ड बंधूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा उपस्थितांच्या अंगावर काटा आणणारा ठरला.



आयोजक :-  महारोगी सेवा समिती, वरोरा अंतर्गत आनंद निकेतन महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस विभाग.दिनांक :- ३१ ऑगस्ट २०२६, सकाळी ११ वाजता पार पडला आहे. स्थळ :- आनंद निकेतन महाविद्यालयाचे सभागृह होता. प्रमुख समन्वयक व मार्गदर्शक :- डॉ. संदीप पारखी (Lt. Dr. Sandip Parkhi) लता आत्राम (Lt. Lata Atram)
प्रा. धनश्री पांचभाई (Prof. Dhanashri Panchbhai)
प्रा. नीरज आत्राम (Prof. Neeraj Atram)प्रा. सुरेश राठोड (Prof. Suresh Rathod) विद्यार्थ्यांच्या तुफान उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण वरोरा शहरात एक अनोखा संदेश दिला असून, सैनिक व रक्षकांशी नाते जोडण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम वृत्तपत्रात छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यासाठी अत्यंत समर्पक ठरत आहे.