Home जिल्हा भद्रावतीत ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन सोहळा’ भव्य्यदिव्य आयोजन; सेवानिवृत्त व कार्यरत...

भद्रावतीत ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन सोहळा’ भव्य्यदिव्य आयोजन; सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांचा होणार गौरव.

भद्रावती :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल, रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर (रजी. नं. E-635) यांच्या वतीने आगामी शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता भद्रावती येथील श्री मंगल कार्यालय, मेन रोड येथे भव्य ‘शिक्षक दिन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक घडामोडी, शिक्षकांचे प्रश्न आणि त्यांच्या अमूल्य योगदानाला उजाळा देण्यासाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे खरे साधन असून, आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे धडे देण्यासाठी शिक्षक अहोरात्र मेहनत घेत आहेत. याच उद्देशाला समोर ठेवून शिक्षकांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या गौरवासाठी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर लगेच सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.



💥 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये 💥
दिनांक व वेळ :- शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६, सकाळी ११:३० वाजता.
👉 स्थळ :-श्री मंगल कार्यालय, मेन रोड भद्रावती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा. श्री. सुधाकरजी अडबाले साहेब (आमदार, शिक्षक मतदारसंघ).
कार्यक्रमाचे उद्घाटक :-  मा. श्री. हंसराजजी अहिर साहेब (माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी गृहराज्यमंत्री).
प्रमुख उपस्थिती व पाहुणे :- मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर (खासदार, चंद्रपूर वणी आणी लोकसभा क्षेत्र), मा. करणदादा देवतळे (आमदार, ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा), मा. प्रा. श्रीकांतजी पाटील (अध्यक्ष, लोक शिक्षण संस्था, वरोरा), मा. श्री. रविंद्रजी शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जि. म. सहकारी बँक मर्या., चंद्रपूर), मा. श्री. राजू डोंगरे (सभापती, कृ. उ. बाजार समिती, भद्रावती) आणि डॉ. प्रकाश महाकुलकर (गट-शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, भद्रावती).



ट्रस्टतर्फे राबविण्यात येणारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
👉  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना
👉  विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम
👉  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शक उपक्रम
👉  श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान
👉  हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना
👉  डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना
👉  अनाथॉची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना
👉 कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा
समस्त आदरणीय सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच बंधू-भगिनींनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपले विनीत :- प्रा. धनराजजी आस्वले (अध्यक्ष)
सौ. रुपाली रविंद्र शिंदे (सचिव),श्रीमती सुषमाताई शिंदे (कोषाध्यक्ष)