Home जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; वरोऱ्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांना...

भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; वरोऱ्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

वरोरा :- भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष मा. श्री. हरीशजी शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे सामाजिक उपक्रमांची पर्वणी साधत ‘भाजप मित्र परिवार’तर्फे जि.प. प्राथमिक कन्या विद्यालय, वरोरा येथे शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाच्या वाटेवरोवर एक आदर्श पायंडा पाडण्यात आला आहे.



🙏मान्यवरांची विशेष उपस्थिती 🙏
या प्रेरणादायी सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे, माजी तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रमेशजी राजुरकर, महिला अध्यक्ष लीलाताई बोंडे, जिल्हा पदाधिकारी कीर्ती कातोरे, महिला शहर महामंत्री माधुरी गोंडे, ज्योती मोहितकर, शोभा वनकर, आणि लक्ष्मी घुडे आवर्जून उपस्थित होत्या.
तसेच युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अनिकेत नाकाडे, आयटी सेलचे जिल्हा संयोजक राहुल दागमवार, संजय राम, गजानन राऊत, महेश उपाध्ये, ओम यादव, पंकज जाधव, मनोज पाचभाई, राजू भोयर, विलास दारापूरकर, जगदीश तोटावार, आणि संदीप गांधी यांच्यासह भाजप मित्र परिवारातील अनेक प्रमुख शुभचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
शाळेतील विद्यार्थिनींना वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून हरीशजी शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच या सामाजिक उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.