Home जिल्हा शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीकजी शर्मा यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात...

शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीकजी शर्मा यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला

चंद्रपूर :–छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करून, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डाँ श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना पूर्व विदर्भ मीडिया प्रमुख योगेश पौनीकर यांच्या नेतृत्वात, शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांचा वाढदिवस बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण व 20 % राजकारण या विचारांचा वारसा राखून शिवसेना सोशल मीडिया लोकसभा चंद्रपूरच्या वतीने डेबूजी सावली देवाडा चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेना सोशल मीडिया लोकसभा चंद्रपूर तर्फे वृद्धाश्रमातील वृद्धाना फळे, अल्फोहार, मिठाई वाटप करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमातील लोकांनी प्रतीक शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत गायन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



तसेच आम्ही लाडके एकनाथ भाऊ समहिलांच्या विकासासाठी विविध योजना आणत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे वृद्धाश्रमातील महिलांनी केला.त्यावेळी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे संचालन शिवसेना सोशल मीडिया लोकसभा प्रमुख चंद्रपूर गणेश चिडे यांनी केले, प्रास्ताविक जेष्ठ शिवसैनिक ललित कासट, शिवसेना लोकसभा प्रमुख सोशल मीडिया सुयोग अवथरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख चंद्रपूर प्रशांत रोहणकर यांनी केले.शिवसेनेच्या सोशल मीडिया च्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना व उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच काम डिजिटल मीडिया द्वारे चंद्रपूर लोकसभाचे पदाधिकारी उत्कृष्ट पद्धतीने काम करत असल्याचे अशे व्यक्तव पूर्व विदर्भ मीडिया प्रमुख योगेश पौनिकर यांनी केले.



वाढदिवसानिमित्त डेबूजी सावली वृद्धाश्रमचे समस्त सदस्य, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या निशा धोंगडे, युवा शिवसैनिक अंकित जोगी, ऋषिकेश जुमडे, कुणाल बावणे उपस्थित होते.सोशल मीडिया हे आजच्या डिजिटल युगात काळजी गरज आहे त्या माध्यमातून जनतेला न्याय मिळू शकते अशे व्यक्तव शिवसेना सोशल लोकसभा प्रमुख चंद्रपूर गणेश चिडे यांनी केले. भविष्यात शिवसेना सोशल मीडिया च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार अशे व्यक्तव शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख प्रशांत रोहणकर यांनी म्हटले.