Home जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का उरकुडेची गरुडझेप; सावली तालुक्यात प्रथम.साथ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा विशेष...

शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का उरकुडेची गरुडझेप; सावली तालुक्यात प्रथम.साथ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा विशेष सत्कार

सावली :- इयत्ता चौथीच्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उसेगाव येथील होतकरू विद्यार्थिनी कु. तनिष्का गिरीधर उरकुडे हिने ८१.३३ गुण प्राप्त करत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशासह तिने संपूर्ण सावली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शैक्षणिक मानत भर घातली आहे.



कु. तनिष्काच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत ‘साथ फाउंडेशन’च्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. सावली येथील साथ Satisfaction कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या हस्ते तनिष्काला शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तनिष्काचे हे यश तिच्या आई-वडिलांसह शाळा, गाव आणि संपूर्ण सावली तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.”



या सत्कार सोहळ्यास खालील मान्यवर उपस्थित होते
श्री. मुन्नाभाऊ स्वामी (अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी संस्था तथा भाजपा नेते) श्री. अतुलजी कोडापे (आदिवासी समाजाचे नेते) श्री. उमेशजी गोलेपल्लीवार (तालुकाप्रमुख, शिवसेना शिंदे गट) श्री. रोहन राहूतकर (संचालक तथा रुग्णमित्र, साथ फाउंडेशन) श्री. राहुलजी सहारे (माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, उसेगाव)
ज्योतीताई जवादे  श्री. गिरीधर उरकुडे (तनिष्काचे पालक) साथ फाउंडेशनचे संचालक श्री. ईश्वरभाऊ बट्टे, श्री. प्रकाशजी वरगंटीवार, सचिव श्री. आशिषजी गेडाम, श्री. प्रफुलजी निरूडवार, तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.