Home जिल्हा संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोराचा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डंका! सहा प्रतिभावान खेळाडूंची...

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोराचा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डंका! सहा प्रतिभावान खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

वरोरा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि उत्तम डावपेचांचा कस लागणाऱ्या या स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला.



या स्पर्धेतून विद्यालयाच्या  सहा खेळाडूंची आगामी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
💥 यशस्वी खेळाडूंची नावे 💥
💠 श्रीहन राऊत
💠 परिधि बोढे
💠 सिद्धी मुथा
💠 प्रज्वल मेश्राम
💠 सम्यक मुथा
💠 साहिल पवार
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन व तोंड गोड करून अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतही अशीच दमदार कामगिरी करून विद्यालय व वरोरा तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा देत सर्वांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.