तुकाराम मुंढेंचा नवा बडगा! खाद्यतेलातील भेसळीवर FDA ची कडक कारवाईचा इशारा राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा अन्न व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत. दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांतील भेसळीवर धडक कारवाई केल्यानंतर, आता मुंढेंनी आपला मोर्चा खाद्यतेलाच्या (Edible Oil) गुणवत्तेकडे वळवला आहे.
खाद्यतेलातील भेसळ आणि नियमबाह्य प्रकार रोखण्यासाठी एफडीएने कंबर कसली असून दोषींवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
💥 प्रमुख मुद्दे आणि कारवाईचा बडगा 💥
सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर बंदी :- आता बाजारात कोणत्याही स्वरूपात सुट्टे (Loose) खाद्यतेल विकता येणार नाही. नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर थेट कारवाई केली जाईल.
💥 अनधिकृत मिश्रण आणि रिपॅकिंग :- विविध तेलांचे अनधिकृत मिश्रण करणे, एक्सपायरी डेट संपलेले तेल पुन्हा रिपॅक करून विकणाऱ्यांवर प्रशासनाची विशेष नजर असणार आहे.
💥 वारंवार तळणीचे तेल वापरणारे रडारवर :- हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार (Reuse) वापर केला जातो, ज्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. अशा हॉटेल्स आणि व्यावसायिकांची आता कसून तपासणी होणार आहे.
💥 व्यापारी व साखळी रडारवर :- या नव्या नियमांमुळे केवळ मोठे खाद्यतेल उत्पादक आणि वितरकच नव्हे, तर गल्लीबोळातील किराणा दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकही एफडीएच्या निशाण्यावर आले आहेत.
🙏 ग्राहकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे 🙏
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
💥 तेल खरेदी करताना पॅकेटचे सील, लेबल आणि एक्सपायरी डेट (उत्पादन व समाप्ती काळ) आवर्जून तपासा.
💥 भेसळयुक्त किंवा संशयास्पद तेलाची माहिती तात्काळ FDA प्रशासनाला द्यावी.
💥 थोडक्यात काय तर,सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना तुकाराम मुंढेंच्या या नव्या आदेशामुळे मोठा चाप बसणार असून, तेल व्यावसायिक व दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.




